संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर शहर, बाजारपेठ आणि मुख्य महामार्गावर सार्वजनिक वाहतुकीला अडथळा ठरेल अशा रितीने वाहने उभी करणाऱ्या चालकांविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्याने धडक कारवाई सत्र राबवले आहे. ३० ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलीस पथकाने तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाहतुकीला व पादचाऱ्यांना धोका निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पहिली कारवाई संगमेश्वर बाजारपेठ ते रामपेठ दरम्यान जाणाऱ्या मुख्य सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली. येथील 'मे. प्रिया फूड्स' या दुकानासमोर चालकाने आपली महिंद्रा बोलेरो पिकअप (गाडी क्र. एम.एच. १२ क्यु.जी. ८३४८) रस्त्यावर ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना व इतर वाहनांना धोका निर्माण होईल अशा अव्यवस्थित स्थितीत उभी करून ठेवली होती. याप्रकरणी पोलीस अमंलदार ज्ञानेश्वर मच्छिंद्र मांडरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक आरोपी संदीप राजाराम सकटे (वय ४०, रा. मोहरे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई संगमेश्वर ते चिपळूण जाणाऱ्या मुख्य हायवे रस्त्यावर करण्यात आली. या ठिकाणी संशयित आरोपी चालक संदेश संजय साबळे (वय २०, रा. फणसवणे) याने आपली पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप (गाडी क्र. एम.एच. ०८ ए.पी. ७८३४) महामार्गावर रहदारीस थेट अडथळा निर्माण होईल अशा रितीने उभी केली होती. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल महादेव बंडगर यांच्या तक्रारीवरून चालकावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, तिसरी कारवाई संगमेश्वर ते देवरुख जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दत्तकृपा मोबाईल शॉपीसमोर करण्यात आली. या ठिकाणी चालक शैलेश प्रभाकर दाभाडे (वय ५२, रा. कोड असुर्डे) याने आपली मारुती वॅगनआर कार (गाडी क्र. एम.एच. ०८ ए.एक्स. ०८२४) रस्त्याच्या मध्यभागी ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनांना अडथळा ठरेल अशा स्थितीत पार्क केली होती. याप्रकरणी पोलीस अमंलदार ज्ञानेश्वर मांडरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या तिन्ही कारवायांमध्ये संगमेश्वर पोलिसांनी आरोपी चालकांवर 'भारतीय न्यायसंहिता २०२३' चे कलम २८५ तसेच 'भारतीय दंड संहिता १८६०' चे कलम २८३ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक रस्त्यावर आणि बाजारपेठेत अशा प्रकारे बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या आणि नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

















































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.