loader
Breaking News
Breaking News
Foto

दांडी श्रीकृष्णवाडी आयोजित नारळ लढविणे स्पर्धेत अमन केळूसकर विजयी

मालवण (प्रतिनिधी) - मालवण दांडी येथे दांडी श्रीकृष्णवाडी तर्फे आयोजित पुरुषांसाठी नारळ लढविणे स्पर्धेत अमन केळूसकर विजेते ठरले. तर कृष्णा लोणे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. प्रथम विजेत्यास मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर पुरस्कृत रोख रु. १५ हजार व चषक तसेच द्वितीय विजेत्यास नगरसेवक महेश कोयंडे पुरस्कृत रोख रु. १० हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच रोहन आचरेकर व हर्षद तलावडेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. यावेळी नगरसेविका अन्वेषा आचरेकर, नगरसेवक महेश कोयंडे, स्पर्धेचे आयोजक सचिन तारी, गणेश तारी, काशीराम तारी, प्रसाद धुरी, वसंत धुरी, लीलाधर धुरी, राजू धुरी आदी व इतर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg