loader
Breaking News
Breaking News
Foto

ताम्हिणी घाटमार्ग ठरतोय ’गुन्हेगारीचा हॉटस्पॉट’! सहा महिन्यांत दोन हत्या, पोलीस गस्तीसह कोंडेथर चेकपोस्ट पुन्हा सुरू करा

खेड - रायगड आणि पुणे जिल्हाला ओक्षणाच्या निसर्गस्य ताम्हिणी घाटात गेल्या काही महिन्यांपासून घडणार्‍या गंभीर गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत या परिसरात दोन हत्यांच्या घटना घडल्याने ताम्हिणी घाटाबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जानेवारी महिन्यात सुमारे २५ वर्षीय तरुणाची हत्या झाल्यानंतर आता ऑगस्टमध्ये सुमारे ३० वर्षीय तरुणीची हत्या झाल्याने ताम्हिणी घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. एकीकडे निसर्गाचे अद्भुत सौंदर्य, धबधबे आणि हिरवाई व ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेला ताम्हिणी घाट आता वारंवार घडणार्‍या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत येत आहे. त्यामुळे निसर्गरम्य ताम्हिणी घाट की गुन्हेगारीचा हॉटस्पॉट? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. माणगाव-पुणे ताम्हिणी घाट मार्ग हा कोकण आणि पश्चिग महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्वाचा आणि जवळचा दळणवळणाचा मार्ग आहे. सुमारे पंचवीस वर्षापासून या मार्गामुळे दोन्ही भागांतील प्रवास अधिक सुलभ झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जात असल्याने कोकणातील असंख्य विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने या मार्गे पुण्याकडे ये-जा करतात. या मार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे छोट्या-मोठ्या व्यवस्रायांना चालना मिळाली असून, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातून कोकणातील पर्यटनस्थळांकडे येणार्‍या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. पावसाळ्यात ताम्हिणी घाटाचे रूप अक्षरशः स्वर्गीय होते. शेकड़ों मीटर उंच डोंगर पर्वतावरून कोसळणारे फेसाळ धबधबे, धुक्याची चादर पांघरलेले डोंगर, खोल दर्‍यांमध्ये पसरलेली हिरवाई, रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली घनदाट झाडी आणि वार्‍याच्या तालावर डोलणार्‍या वृक्षवेली यामुळे संपूर्ण घाट परिसर जणू निसर्गचित्रच भासतो. धबधब्यांच्या तुषारांनी चिंब झालेला रस्ता, ढगांच्या कुशीत हरवून जाणार्‍या डोंगर रांगा आणि हिरव्यागार वनराईतून दळणवळणाने हा घाटमार्ग पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतो. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र याच घनदाट जंगलाची, खोल दर्‍यांची आणि कडेकपारीची दूसरी बाजूही तितकीच गंभीर आहे.

टाईम्स स्पेशल

दिवसा वर्दळ, रात्री मात्र शुकशुकाट दिवसा ताम्हिणी घाटातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असली तरी रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी या मार्गावर वाहतूक तुलनेने नगण्य होते. घनदाट जंगल, अंधार, निर्जन भाग, डोंगरदर्‍या आणि मोबाईल नेटवर्कच्या मर्यादा यामुळे एखादे अनुचित घटना घडल्यास तातडीने मदत मिळणे अनेकदा आव्हानात्मक ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर घाट परिसरात पोलिसांची नियमित आणि प्रभावी गस्त असणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पुणे आणि रायगड जिल्हाच्या हद्दीतील स्त्यावर कोंडेथर गावाजवळ पूर्वी पोलिसांचे चेकपोस्ट होते. मात्र सध्या या ठिकाणी पोलिसांची नियमित उपस्थिती नसल्याने या मार्गावरून ये-जा करणार्‍या वाहनांची तपासणी आणि देखरेख कमी झाल्याची भावना नागरिकांमधून बोलताना व्यक्त होत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच संशयास्पद वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी कोंडेथर येथील चेकपोस्ट पुन्हा कार्यान्चित करावे, अशी मागणी जोर धरत आहे. त्याचबरोबर रायगड़ आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे या संपूर्ण घाट मार्गावर विशेष गस्त व्यवस्था निर्माण करण्याची गरज व्यक्त होत आहे. ताम्हिणी घाट हा केवळ गुन्हेगारीच्या दृष्टीने नव्हे, तर अपघातांच्या दृष्टीनेही संवेदनशील मार्ग आहे. तीव्र वळणे, उतार, पावसाळ्यातील निसरडे रस्ते, धुके आणि काही ठिकाणी कमी दृश्यमानता यामुळे अपघातांचा धोका कायम असतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg