loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्णेश्वर व संगमेश्वर मंदिर वारसा स्थळांना विशेष भेट; ३० ऑगस्टला वारसा सहलीचे आयोजन

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : प्रस्तावित इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH) कोकण चॅप्टरच्या वतीने संगमेश्वर येथील ऐतिहासिक कर्णेश्वर व संगमेश्वर मंदिरांचा वारसा सहल आयोजित करण्यात आली आहे. रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता कर्णेश्वर मंदिर परिसरात या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. या वारसा सहलीसाठी भारतविद्यातज्ज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ व इतिहास संशोधक साईली पलांडे-दातार मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी मंदिरांच्या स्थापत्यशैलीसह ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची माहिती सहभागी नागरिकांना देण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सहलीचे विशेष आकर्षण म्हणून गौरव लवेककर (नाणी संग्राहक) यांच्या दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. मंदिर भेटीनंतर प्रस्तावित INTACH सदस्यांची बैठक होणार असून, त्यानंतर हेरिटेज वॉकने या उपक्रमाचा समारोप होईल. या वारसा सहलीसाठी सर्वांसाठी मोफत प्रवेश असून इतिहास, पुरातत्त्व, कला आणि स्थानिक वारशात रस असलेल्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg