रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले असून, जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. चार नवीन मतदारसंघ वाढल्याने यंदा एकूण २५ मतदारसंघ झाले आहेत. विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे हे निवडणूक लढविणार असल्याचे समजते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे समीकरण महत्त्वाचे ठरणार असून, पालकमंत्री ना. उदय सामंत आणि डॉ. चोरगे हेच प्रमुख निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठीही महायुतीमध्ये एक फॉर्म्युला चर्चेत असल्याचे समजते. निवडणुकीनंतर पहिले एक वर्ष पालकमंत्री ना. उदय सामंत अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील आणि त्यानंतर उर्वरित चार वर्षे डॉ. तानाजीराव चोरगे अध्यक्ष राहतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. महायुतीमध्ये मतदारसंघनिहाय समन्वय साधला गेला, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पातळीवर हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खेड तालुका शेती मतदारसंघात मात्र संभाव्य निवडणुकीची चुरस निर्माण झाली आहे. या मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सभापती अण्णा कदम इच्छुक आहेत. त्याच मतदारसंघातून विद्यमान उपाध्यक्ष बाबाजी जाधव हेही इच्छुक असल्याने, या मतदारसंघात निवडणूक होण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे. २५ मतदारसंघ, महायुतीचे समीकरण, अध्यक्षपदाचा फॉर्म्युला आणि खेडमधील संभाव्य लढत यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.