loader
Breaking News
Breaking News
Foto

‘रत्नागिरीचा राजा’ आगमन मिरवणुकीनिमित्त रविवारी वाहतूक मार्गात बदल; साळवी स्टॉप ते माळनाका मार्ग सायंकाळी बंद

रत्नागिरी, : येथील 'श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ', मारुती मंदिर यांच्यावतीने उद्या रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी गणपती मूर्तीची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. साळवी स्टॉप ते मारुती मंदिर या मार्गावर सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत निघणाऱ्या या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक मार्गात बदल केले आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा व मोटार वाहन कायद्यान्वये अधिसूचना जारी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बंद मार्ग : साळवी स्टॉप ते माळनाका ओव्हर ब्रिज (डावी बाजू) या दिशेने येणारी सर्व प्रकारची वाहतूक ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते रात्री १० या कालावधीत पूर्णपणे बंद राहील. पर्यायी मार्ग : वाहनचालकांसाठी साळवी स्टॉप – नाचणे लिंक रोड – आयटीआय – अभ्युदय नगर – पॉवर हाऊस – गजानन महाराज मंदिर – सोमेश्वर दुकान – हिंदू कॉलनी मार्गे थिबा पॅलेस रोड ते माळनाका रेस्ट हाऊस या पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

ही अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, शासकीय वाहने तसेच व्हीआयपी दौऱ्यातील अधिकृत वाहनांना लागू असणार नाही. अत्यावश्यक प्रसंगी स्थानिक पोलीस अधिकारी परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेतील. या तात्पुरत्या अधिसूचनेबाबत कोणाचे काही आक्षेप किंवा हरकती असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा; पुढील अधिसूचना निर्गमित करताना अशा हरकतींचा विचार करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg