loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसाचे पाणी ठरणार आंबा बागेची संजीवनी! वनौशीत कृषी विद्यार्थ्यांकडून ’कोकण जलकुंडा’चे प्रात्यक्षिक

दापोली (सागर गोवळे) - ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या ‘कृषिस्नेही’ व ‘कृषिसखी’ गटाने वनौशी येथे एक अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते साठवणे आणि पाणीटंचाईच्या काळात आंबा बागेला संजीवनी देणे, या उद्देशाने गावात प्रत्यक्ष ’कोकण जलकुंड’ तयार करून शेतकर्‍यांना त्याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वतः श्रमदान करून जलकुंड उभारले. या जलकुंडाची एकूण पाणी साठवण क्षमता तब्बल ४ घनमीटर म्हणजेच ४,००० लिटर इतकी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रात्यक्षिकादरम्यान विद्यार्थ्यांनी केवळ जलकुंड बनवून दाखवले नाही, तर त्यासंबंधीची सर्व तांत्रिक माहितीही शेतकर्‍यांना दिली. वाहून जाणारे पावसाचे पाणी जलकुंभाच्या माध्यमातून अडवून भीषण टंचाईच्या काळात आंबा बागेला जगवता येऊ शकते, ही नवी उमेद या प्रात्यक्षिकाने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये निर्माण केली आहे. कृषी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे वनौशी ग्रामस्थांकडून जोरदार कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg