ठाणे (प्रतिनिधी) - ज्या दुर्गम शाळांच्या अंगणात कधीकाळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या मायेची पाऊले पडली, त्याच शाळांमध्ये त्यांच्या २५व्या पुण्यतिथीनिमित्त ‘ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान’ने पुन्हा माणुसकीची ओंजळ पोहोचवली. दिघेसाहेबांच्या सेवाव्रताच्या आठवणींना उजाळा देत वाडा तालुक्यातील गोर्हे, कंचाड आणि वावेघर येथील चिमुकल्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करून त्यांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्यात आले. धर्मवीर आनंद दिघे हे केवळ राजकारणातील व्यक्तिमत्त्व नव्हते, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मायेचा हात पोहोचविणारे सेवाव्रती व्यक्तिमत्त्व होते. ठाणे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागांतील गरजू विद्यार्थ्यांची गरज ओळखून ते स्वतः अशा शाळांमध्ये जात असत. विद्यार्थ्यांच्या हातात वह्या, शालेय साहित्य देतानाच त्यांच्या चेहर्यावर उमटणारा आनंद ते आपला आशीर्वाद समजत असत.
गेली २३ वर्षे याच आठवणींना जिवंत ठेवत ‘धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान’ने २५ ऑगस्ट रोजी वाडा तालुक्यातील गोर्हे, कंचाड आणि वावेघर येथील शाळांना भेट दिली. दिघेसाहेब ज्या शाळांमध्ये स्वतः जाऊन विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करीत असत, त्याच शाळांमध्ये त्यांच्या २५व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना वह्या, कंपास बॉक्स, पेन सेट आणि अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला केवळ साहित्यवाटपाचे स्वरूप नव्हते; प्रत्येक वस्तूसोबत दिघेसाहेबांच्या आठवणींची ऊब आणि सेवाभावाची शिकवण होती. दिघेसाहेब आज शरीररूपाने आपल्यात नसले तरी त्यांनी ज्या माणुसकीची बीजे पेरली, त्यातून आजही सेवेची फुले उमलत आहेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सुरेल स्वागतगीताने वातावरण भावूक झाले. चिमुकल्यांच्या निरागस स्वरांनी उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला. त्यांच्या स्वागताने भारावून गेलेल्या प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. गरजू मुलांच्या चेहर्यावर उमटलेला आनंद हेच या सेवाकार्याचे खरे फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यासाठी श्याम भाई ठाकरे, नूर मोहमद मुजावर, अरुण उपार, आनंद ठाकरे आदींनी अथक परिश्रम घेतले.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.