loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरपा पाटोळेवाडीचा सुपुत्र प्रणव गुरव याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पाटोळेवाडी हे मुळगाव असलेला प्रणव प्रमोद गुरव याने आंतरराष्ट्रीय दर्जाचा भारतीय धावपटू (अथलिट) म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारताचा सर्वात वेगवान धावपटू म्हणूनही त्याने मान मिळवला आहे. देवरुख येथील कार्यक्रमात आधार ग्रुप लिंगायत समाज, तालुका संगमेश्वर परिवारातर्फे त्याच्या या यशाचा गौरव करण्यात आला आहे. वडील कामानिमित्त पुणे दौंड येथे गेली अनेक वर्षांपासून राहत असल्याने प्रणव याचे बालपण पुण्यातच गेले. मात्र सणासूदीला तो वडिलांबरोबर गावी साखरपा येथे येत असतो. प्रणवने पुण्यातच १२ वी नंतर इंजिनिअरिंग केले. त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील यशस्वी कामगिरीमुळे स्पोर्ट्स कोट्यातून रेल्वे ऑफिसमध्ये प्रणवला क्लार्कची नोकरी मिळाली. नोकरी करत असताना देखील खेळातील आवड प्रणव जपत आहे. प्रणव रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रणव याचे सख्खे आजोबा हरी गुरव हे SRP ग्रुप नं. ५ दौंड येथे कार्यरत होते. तर चुलत आजोबा शांताराम गुरव हे भारतीय थलसेना दलात सेवेत होते. १९६२ व १९७२ च्या युद्धात त्यांनी विशेष कामगिरी केली आहे. तसेच रावजी गुरव हे नायर रुग्णालयात सेक्युरिटी गार्ड या पदावर सेवेत होते. काका पुणे शहरात पोलिस सेवेत आहेत. तर वडील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत. या सर्वांकडून प्रणवला मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ मिळत आले आहे. २० जून २०२६ रोजी चीन येथे पार पडलेल्या आशियाई रिले चॅम्पियनशीप स्पर्धेत आशियाई ४×१०० मीटर रिले मिक्स फायनलमध्ये भारताकडून खेळताना प्रणवने ब्रांझ पदक पटकवले आहे. तर ६५ व्या नॅशनल इंटरस्टेट सिनिअर अथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेमध्ये १०० मीटर धावणे या प्रकारात १०.३९ सेकंदात हे अंतर पार करून राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक पटकावले आहे. प्रणव प्रामुख्याने १०० मीटर शर्यतीत सहभाग घेतो. एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या २८ व्या राष्ट्रीय फेडरेशन सीनियर अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने १०.२७ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले आणि भारताचा सर्वात वेगवान धावपटू म्हणून मान मिळवला.

टाईम्स स्पेशल

तसेच १०० मीटरचे १०. २७ सेकंद, २०० मीटरचे २१. २ सेकंद अशी कामगिरी, १.४x१०० मीटर रिले साठी साऊथ कोरिया येथे आयोजित जागतिक स्पर्धा भाग घेतला. १×१०० मीटर रिलेसाठी चीन येथे आयोजित जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये भाग घेतला २०२३ मध्ये ३७व्या राष्ट्रीयस्तरावर गोवा येथे १०.४१ सेकंदांच्या कामगिरीसह १०० मीटरमध्ये रौप्य पदक विजेता, रांची येथे आयोजित फेडरेशन चषक २०२३ मध्ये १०० मीटरमध्ये ३.४ वा उपांत्य फेरीत १०.४६ सेकंदांच्या कामगिरीसह, चेन्नई येथे आयोजित १०.७१ सेकंदांच्या कामगिरीसह ८२ व्या अखिल भारतीय विद्यापीठ अंतर्गत २०२३ मध्ये १०० मीटरमध्ये सुवर्णपदक विजेता, छत्तीसगढ येथे आयोजित १०.३९ सेकंदांच्या कामगिरीसह २रा U२३ राष्ट्रीय चॅम्पियनशिप-२०२२ मध्ये १०० मीटरमध्ये सुवर्णपदक विजेता अशी वैयक्तिक कामगिरी करत उज्वल यश संपादन केले आहे. त्याच्या कामगिरीमुळे साखरपा गावचे व लिंगायत समाजाचे नाव उंचावले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg