loader
Breaking News
Breaking News
Foto

आय.सी.एस. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवकांनी अनुग्रह विशेष शाळेत साजरे केले रक्षाबंधन

खेड, (रत्नागिरी) (प्रतिनिधी) : आय.सी.एस. महाविद्यालय, खेड येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या स्वयंसेवकांनी वेरळ येथील अनुग्रह विशेष शाळेला भेट देऊन रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा केला. अनुग्रह विशेष शाळेत पोहोचल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच इतर शिक्षकांनी एनएसएस स्वयंसेवकांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष शाळेतील विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरे करून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांसोबत गाणी गाऊन, संवाद साधत विविध मनोरंजक उपक्रमांमध्ये सहभाग घेत आनंदाचे क्षण अनुभवले. ‘नॉट मी बट यु’ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्रीदवाक्याला साजेसा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता, समता, आपुलकी आणि सेवाभाव निर्माण करणारा ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg