loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरपा तळवाडीतील रस्ता दोन्ही बाजूंनी महामार्गाला जोडला जाणार

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील साखरपा तळवाडी गावातील वाहतुकीचा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला एका बाजूने जोडून दुसर्‍या बाजूने बंद केला आहे. त्यामुळे गावामध्ये असणारे पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, रेशन दुकान, बाजारपेठ या ठिकाणी येणार्‍या जाणार्‍या ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय झाली आहे. येथील शिवसेना कार्यकर्ते ओंकार कोलते, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने आमदार किरण सामंत यांना दोन्ही बाजूने महामार्गाला रस्ता जोडण्यासंदर्भात निवेदन दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येथील ग्रामस्थांच्या अडचणी संदर्भात रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बापू शेट्ये यांनी प्रत्यक्ष आमदार किरण सामंत त्यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. आमदार किरण सामंत यांनी ताबडतोब हायवे कंपनी रवी इन्फ्राच्या अधिकार्‍यांना कॉल करून तळवाडीतील रस्ता दोन्ही बाजूने महामार्गाला जोडण्यासंदर्भात सूचना दिल्या. व काही गोष्टी कमी पडत असल्यास आपण त्या देऊ पण रस्ता पक्का झाला पाहिजे, असे सामंत यांनी सांगितले. लवकरच हा रस्ता महामार्गाला दोन्ही बाजूंनी जोडला जाईल, असे रवी इन्फ्रा कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg