loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड एस.टी. बसचा कारभार ढेपाळलेला, बस गाड्या केव्हा येतील याचा भरोसा नाही

मंडणगड (प्रतिनिधी) : वेळेवर सुटेल तर ती एस. टी. कुठली कारण अनियमित एस.टी. सेवा हे नेहमीचे झाले आहे, मात्र यामुळे प्रवाशांना मात्र बस कधी फलाट क्रमांकावर लागतेय यासाठी कित्येक वेळ ताटकळतच उभं राहून एस.टी. लागण्याची वाट पाहावी लागते. तसे शनिवारी मंडणगड एसटी स्टँडमध्ये झाले. मंडणगड एस.टी. स्टँडमधून ग्रामीण भागातील विविध मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी बसेस सोडल्या जातात. एस. टी. बसेसच्या निर्धारित वेळेचा विचार करत बसमध्ये बसण्यासाठी प्रवासी वेळेवर बस पकडण्यासाठी एस. टी. स्टँड येथे येत असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये विद्यार्थी आणि ग्रामीण भागातून आपल्या काही कामानिमित्त मंडळ शहरात आलेले प्रवासी ग्रामस्थ असतात. मात्र अनेकदा वेळेवर एस. टी. बस लागत नाहीत. तसेच शनिवारी मंडणगड एसटी स्टँडमध्ये झाले. दुपारी एस.टी बसमधून प्रवास करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी मंडणगड एसटी स्टँडवर आले खरे मात्र अर्धा तास उलटून गेला तरी स्टँडवर एकही बस लागलेली नव्हती. त्यामुळे सर्वच ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांचा खोळंबा झाला. या संदर्भात वाहतूक नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे बसेस वेळेवर येत नाहीत. बस येण्यास थोडाफार उशीर होत आहे. पण बसेस येतील आणि त्या तत्काळ एस.टी. स्थानकातून सुटतील.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg