loader
Breaking News
Breaking News
Foto

घेरा पालगड ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रवीण चव्हाण

खेड (प्रतिनिधी) - घेरा पालगड ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण प्रकाश चव्हाण यांची सलग तिसर्‍यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेत गावकर्‍यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामसभेच्या बैठकीस सरपंच सुधीर नाना कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी चव्हाण यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबविणे, गावातील वाद-विवाद सामोपचाराने सोडविणे तसेच सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांची सलग तीन वर्षे बिनविरोध निवड होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या निवडीबद्दल प्रवीण चव्हाण यांचे ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg