loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्र सेविका समिती म्हसळा तर्फे पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम

म्हसळा : राष्ट्र सेविका समिती म्हसळा तर्फे रक्षाबंधनानिमित्त पोलीस बांधवांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून औक्षण केले आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस बांधवांनीही या उपक्रमाबद्दल समितीच्या सेविकांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमातून ‘कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती आदर आणि कृतज्ञता’ व्यक्त करण्यात आली. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि आपुलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. महिलांना कुठलीही अडचण आली तर पोलीस सदैव तुमच्या रक्षणासाठी हजर असतील अशी ग्वाही यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव यांनी उपस्थित महिलांना दिली.यावेळी राष्ट्र समितीच्या सदस्या मोठ्या प्रमाणात उपस्थीत होत्या.

इम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg