loader
Breaking News
Breaking News
Foto

हातीवमध्ये ‘समता ग्राम’ प्रकल्पांतर्गत निबंध लेखन स्पर्धा उत्साहात

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : तालुक्यातील हातीव येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा हातीव नं. १ येथे रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट आणि कॉमनवेल्थ लोकल गव्हर्नन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समता ग्राम’ प्रकल्पांतर्गत निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गावात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मी अनुभवलेली समता’ या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या निबंधातून कुटुंबातील मुलगा-मुलगी भेदभाव, मुलगी म्हणून आई-वडिलांकडून मिळणारी वागणूक, मुलांचे होणारे लाड तसेच त्याचे समाजावर उमटणारे पडसाद याबाबत आपले विचार मांडले. कुटुंब, समाज आणि गावामध्ये स्त्री-पुरुष समानता कशा प्रकारे निर्माण करता येईल, यावरही विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे भाष्य केले. ‘मुली-मुले एकसमान, गावचा खरा सन्मान’ हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या विचारातून अधोरेखित केला, असे रत्नागिरी प्रकल्प समन्वयक शुभांगी कोलगे यांनी सांगितले. या स्पर्धेत आरोही शिवगण हिने प्रथम, ऋतुजा गावडे हिने द्वितीय तर विशाखा गावडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. पूर्वी शिवगण आणि श्रेयश गेल्ये यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी प्रकल्प संचालक भीम रासकर, सरपंच नंदकुमार कदम, उपसरपंच इकबाल साटविलकर, पोलीस पाटील जान्हवी गावडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रेहान गडकरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गावडे, उपाध्यक्ष मानसी कारेकर, माजी केंद्रप्रमुख सुनील करंबेळे आणि मुख्याध्यापक विनय होडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. निबंध स्पर्धेचे परीक्षण विनय होडे, गौरी रावणंग आणि प्रगती ब्रीद यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे प्रकल्प समन्वयक शुभांगी कोलगे यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg