loader
Breaking News
Breaking News
Foto

शेठ म. ग. हायस्कूल, देवगडमध्ये वृक्षाबंधन संपन्न

देवगड (प्रतिनिधी) - रक्षाबंधनाच्या सणानिमित्त राष्ट्रीय हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील वृक्षांना राख्या बांधून त्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमाकरिता विद्यार्थ्यांनी स्वतः पर्यावरणपूरक सुबक राख्या तयार केल्या. याप्रसंगी चिन्मयी लाड या विद्यार्थिनीने वृक्ष प्रतिज्ञा सांगितली. शाळेतील शिक्षक सागर कर्णिक यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक प्रविण खडपकर तसेच पर्यवेक्षिका निशा दहीबावकर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी कलाशिक्षक राजेंद्र कोयंडे यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका स्वरा कोयंडे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg