loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडीत पोलिसांचा अभिनव उपक्रम, वाहतूकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई ऐवजी रक्षाबंधन आणि हेल्मेट वापरण्याचा संदेश

वैभववाडी (प्रतिनिधी) - वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची पद्धत सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, वैभववाडी पोलिसांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून दंडाऐवजी रक्षाबंधन आणि कौतुकातून हेल्मेट वापरण्याचा संदेश देत अनोखा उपक्रम राबविला. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राबवलेल्या या उपक्रमाची शहरात चांगलीच चर्चा रंगली. वैभववाडी बाजारपेठेत शुक्रवारी सकाळी हेल्मेट न घालता दुचाकी चालविणार्‍या वाहनचालकांना महिला पोलिस कर्मचार्‍यांनी रक्षाबंधन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी ’आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करा’, असा भावनिक संदेश देत त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तर हेल्मेट घालून दुचाकी चालविणार्‍या वाहनचालकांना व सीटबेल्ट लावून वाहन चालवणार्‍या चालकांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्या जागरूकतेचे कौतुक करण्यात आले. सामान्यतः वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जाते.

टाईम्स स्पेशल

मात्र, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलिसांनी ’दंडापेक्षा जाणीव महत्त्वाची’ या भावनेतून हा वेगळा उपक्रम राबविला. महिला पोलिस कर्मचार्‍यांनी हेल्मेटविना प्रवास करणार्‍या दुचाकीस्वारांना राखी बांधून त्यांच्या जीविताचे रक्षण व्हावे, अशी प्रार्थना केली. हेल्मेटधारक दुचाकीस्वारांना गुलाबपुष्प देत पोलिसांनी त्यांच्या जबाबदार वाहनचालक वृत्तीचे अभिनंदन केले. पोलिसांच्या या अभिनव उपक्रमामुळे वाहनचालकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg