loader
Breaking News
Breaking News
Foto

आंगवली लाखणवाडीत रिक्षा पलटी; बोंड्ये येथील रिक्षाचालकाचा मृत्यू

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील आंगवली लाखणवाडीतील तीव्र उतारात रिक्षा पलटी होऊन बोंड्ये येथील रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला अपघात; प्रवाशांना आणण्यासाठी जात असताना ही दुर्दैवी अपघात झाला.बोंड्ये येथील विजय काशिराम चव्हाण (वय-५२) यांचा जागीच मृत्यू झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघाताची बातमी समजताच आंगवलीचे माजी सरपंच संतोष अणेराव, पोलीस पाटील सतिश अणेराव, पं. स. सदस्य मंगेश बांडागळे, अनंत जाधव, ललिता गुडेकर यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांनी लागलीच विजय चव्हाण यांना देवरूख ग्रामीण रूग्णालयात दाखल केले मात्र डाँक्टरांनी तपासणी करून मृत घोषीत केले.

टाईम्स स्पेशल

अपघाताची माहिती समजताच देवरूख पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. विजय चव्हाण यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच बोंड्येतील ग्रामस्थ व देवरूखातील रिक्षाचालकांनी देवरूख ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg