loader
Breaking News
Breaking News
Foto

हिंदुस्थान युनिलिव्हरचा ७६ हजारांचा माल लंपास प्रकरणी गुन्हा दाखल, सर्फ एक्सेलची ७,६३२ पाकिटे गायब

खेड (प्रतिनिधी) - खेड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या सर्फ एक्सेल इझीवॉश पावडरचे तब्बल ७६ हजार ३२० रुपये किमतीचे ७६३२ पाकीट लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.३५ वाजल्यापासून ४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील लक्ष्मीनगर महादेववाडी, पेठ येथे घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फिर्यादी यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत हिंदुस्थान युनिलिव्हरच्या परशुराम, लोटे एमआयडीसी येथून माल ट्रक क्रमांक एम.एच. ०९ सी.यू. ७१७६ मधून पाठविण्यात आला होता. मात्र ट्रकमधील सुमारे ७६,३२० रुपये किमतीचा माल संशयित आरोपी सिकंदर उमर पठाण (वय ५०) याने स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने काढून अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ३१६(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा ईश्वरपूर पोलिस ठाणे, सांगली येथे वर्ग करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg