loader
Breaking News
Breaking News
Foto

दहा जणांवर कारवाई करत तब्बल २९ हजारांचा दंड केला वसूल!

रत्नागिरी : शहर पोलिसांनी कर्णकर्कश आवाज करत शहराची शांतता भंग करणाऱ्या बुलेट आणि अन्य उच्च क्षमतेच्या दुचाकीस्वारांवर अखेर अत्यंत आक्रमक बडगा उगारला आहे. नियमांना धाब्यावर बसवून रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी ही धडक मोहीम राबवत एकूण १८ वाहनांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा धडाका चालवला आहे. शहरात बुलेटसह अन्य दुचाकींमध्ये मॉडिफाय केलेले बेकायदेशीर सायलेन्सर बसवून भरधाव वेगात फिरण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमालीचे वाढले होते. या कर्णकर्कश आणि कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे वृद्ध, रुग्ण, लहान मुले आणि सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या त्रासाला कंटाळलेल्या संतप्त नागरिकांनी थेट पोलिसांकडे धाव घेत तीव्र स्वरूपाच्या तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत शहर पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलली. ​परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही धडक मोहीम प्रत्यक्षात आणली. या कारवाईत एकूण १८ वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, विशेषतः मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवून विनाकारण धिंगाणा घालणाऱ्या १० दुचाकी चालकांकडून तब्बल २९ हजार रुपयांचा सक्त दंड जागेवरच वसूल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या अचानक आणि आक्रमक दणक्यामुळे रस्त्यावर कल्ला करणाऱ्या हुल्लडबाज वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

टाईम्स स्पेशल

​यापुढेही ही कारवाई अशीच सलग आणि अधिक तीव्र स्वरूपात सुरू राहणार असल्याचा सज्जड दम पोलीस प्रशासनाने दिला आहे. जे दुचाकीस्वार अजूनही समजण्याच्या पलीकडे आहेत, त्यांना अत्यंत कठोर शब्दांत ताकीद देण्यात आली आहे. वाहनचालकांनी स्वतःहून आपल्या गाड्यांमधील हे बेकायदेशीर सायलेन्सर ताबडतोब काढून टाकावेत, अन्यथा यापुढे असे सायलेन्सर आढळल्यास कोणतीही तडजोड न करता थेट दुचाकी जप्त करण्याची कारवाई केली जाईल, असा कडक इशारा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात यांनी दिला आहे. पोलिसांच्या या तडाखेबंद भूमिकेमुळे शहरातील मज्जा मारणाऱ्या चालकांना मोठा चाप बसला असून सर्वसामान्य नागरिकांमधून या कारवाईचे जोरदार स्वागत होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg