म्हसळा : "हे महादेवा, रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांना तुझ्या दर्शनासाठी घेऊन येईन..." अशी इच्छा शिवसेनेचे म्हसळा तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते रवी लाड यांनी व्यक्त केली होती. आणि कार्यकर्त्याच्या या शब्दाचा मान ठेवत थेट रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार भरतशेठ गोगावले हेच कुटुंबासह देवघरच्या अमृतेश्वराच्या दारी आले. श्रावणी सोमवारचे औचित्य साधत पालकमंत्री गोगावले यांनी म्हसळा तालुक्यातील देवघर येथील पांडवकालीन स्वयंभू अमृतेश्वर मंदिरात, बेल व जलाभिषेक केला. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याने इच्छा व्यक्त करावी आणि पालकमंत्री पदावरील व्यक्तीने ती स्वतः येऊन पूर्ण करावी, हे पाहून म्हसळा तालुक्यातील जनतेला सुखद आश्चर्याचा धक्का बसला आहे.
देवघर हे केवळ धार्मिक स्थळ नसून निसर्गरम्य पर्यटन स्थळही आहे. येथील प्राचीन शंकर मंदिर आणि पावसाळ्यात कोसळणारा भव्य धबधबा पर्यटकांना नेहमीच खुणावतो. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी देवघरला शासनमान्य पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. ग्रामस्थांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत पालकमंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले, "देवघरच्या विकासासाठी शासन दरबारी मी स्वतः पाठपुरावा करेन आणि लवकरच देवघरला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून येथील विकासाला निधी उपलब्ध करून देऊ."
यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, लोकसभा संपर्क प्रमुख अनिल नवगणे, विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटेकर, जेष्ठ नेते रविंद्र लाड, बाळा म्हात्रे, तालुकाप्रमुख अमित महामुणकर, माजी तालुकाप्रमुख प्रसाद बोर्ले, माजी नगराध्यक्ष असहल कादिरी, शाहिद जंजिरकर, संपर्क प्रमुख अमोल पेंढारी, उपतालुका प्रमुख बाबू बनकर, नामदेव घुमकर, युवासेना तालुकाधिकारी महेश पाटील, देवघर ग्रामपंचायतिच्या सरपंच सौजन्या पोटले, मंदिर उत्सव कमिटी अध्यक्ष सुनिल विचारे, संतोष पाखड, नगरसेविका राखी करंबे, सुमय्या कासम आमदानी यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.