तिलारी प्रतिनिधी, दि.28 ऑगस्ट : मांगेली-खोक्रल रस्त्यावर वीज वितरण वाहिनीच्या अगदी जवळ धोकादायक स्थितीत असलेले झाड सध्या अपघाताला निमंत्रण देत आहे. नुकतीच या ठिकाणी ११ केव्ही क्षमतेची नवीन वीजवाहिनी टाकण्यात आली असून, हे झाड वीजवाहिनीवर कोसळल्यास पोल जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याबरोबरच परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या रस्त्यावरून नागरिक तसेच वाहनांची नियमित वर्दळ असते. झाडाची स्थिती पाहता जोरदार वारा किंवा मुसळधार पावसामुळे ते वीजवाहिनीवर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. झाड वीजवाहिनीवर पडल्यास वीजपुरवठ्यात मोठा बिघाड होण्यासोबतच नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो.विशेष म्हणजे, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या काळात झाड कोसळून वीजवाहिनी किंवा पोलचे नुकसान झाल्यास गणेशोत्सवाच्या दिवसांत परिसरातील नागरिकांना वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागू शकतो.
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत मांगेलीचे माजी सरपंच विश्वनाथ गवस यांनी संबंधित वीज वितरण विभागाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. गणेश चतुर्थीपूर्वीच या धोकादायक झाडाची पाहणी करून ते सुरक्षितपणे हटवावे, अशी मागणी गवस यांनी केली आहे.संभाव्य दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा धोका निर्माण होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, असेही गवस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित विभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने झाड हटवावे आणि संभाव्य जीवितहानी तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका टाळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.