loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर निवेदन देताना सोनुर्ली ग्रामस्थ

सावंतवाडी : सोनुर्ली येथून वेत्ये येथे वैयक्तिक क्रशरसाठी ११ केव्ही हायटेक वीज लाईन टाकण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांनी दिलेल्या परवानगीविरोधात सोनुर्ली येथील ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत. या परवानगीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. ​सोनुर्ली येथील ग्रामस्थांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्याजवळ निवेदन दिले. यात सोनुर्ली गावातून वेत्ये येथील वैयक्तिक क्रशरसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्याच्या बाजूने ११ केव्ही हायटेक वीज लाईन टाकण्यास कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, सदर हायटेक वीज लाईन न टाकण्याबाबत सोनुर्ली ग्रामपंचायत ग्रामसभेत एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला होता. याशिवाय स्थानिक ग्रामस्थ आणि जमीन मालक शेतकऱ्यांचा या लाईनला पूर्ण विरोध आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामपंचायतीने यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्र देऊन अशा प्रकारची कोणतीही परवानगी देण्यात येऊ नये, असे कळवले होते. तरीही ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायत कार्यालयाला कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर परवानगी देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ​संबंधित क्रशरसाठी दिलेली परवानगी पुढील आठ दिवसांत रद्द करून तसे लेखी पत्र ग्रामपंचायत कार्यालयाला न दिल्यास, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावंतवाडी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg