loader
Breaking News
Breaking News
Foto

तळवडे येथे ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी एनसीएमसी स्मार्टकार्ड नोंदणी कॅम्पला ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद

तळवडे, : सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने व तळवडे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने तळवडे येथे ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी एन सी एम सी स्मार्ट कार्ड नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला. शनिवारी झालेल्या या कॅम्पला तळवडे व परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सावंतवाडी येथील "दीप बिझनेस" यांच्या माध्यमातून एनसीएमसी कार्ड काढण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. गावातील नागरिकांना कार्डसाठी सावंतवाडी येथे जाण्याची गरज पडू नये आणि शासनाच्या सुविधांचा लाभ त्यांच्या गावातच मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कॅम्पचा सुमारे १०२ ज्येष्ठ नागरिक व महिलांनी लाभ घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून पात्र ज्येष्ठ नागरिक व महिलांना एसटी महामंडळाच्या नियमानुसार उपलब्ध असलेल्या प्रवास सवलतींचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत असून, पात्र ज्येष्ठ नागरिकांनाही नियमानुसार प्रवास सवलतीचा लाभ मिळतो. त्यामुळे नियमित एसटी प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी हे कार्ड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही डिजिटल सुविधा असल्याने एसटी प्रवासातील व्यवहार अधिक सुलभ आणि आधुनिक पद्धतीने करण्यास मदत होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांनी शासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात हेलपाटे न मारता आवश्यक प्रक्रिया गावातच पूर्ण करता आली. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा वेळ, श्रम आणि प्रवासाचा खर्च वाचविणारी ठरली.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र बिर्जे, सचिव प्रकाश राऊळ, सहसचिव शामसुंदर निवेलकर, खजिनदार विदुल पाटकर, कार्यकारिणी सदस्य अण्णा मालवणकर, मुळीक, श्रद्धा सावंत, नंदकिशोर कोंडये, मेघना राऊळ, अमोल केसरकर, बाबा मालवणकर तसेच दीप बिजनेसचे दत्तप्रसाद अरविंदेकर आणि तळवडे येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे नव्याने सदस्य झालेले विजय बुगडे, बाळू साळगावकर, आदींनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान नव्याने सदस्य झालेले बुगडे तसेच साळगावकर यांचे संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी शासनाच्या योजना व सुविधा थेट गावपातळीवर पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असून, भविष्यातही अशा प्रकारचे लोकहिताचे उपक्रम राबविण्याचा मानस सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाने व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg