loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्यापासून दुध महागणार, किचनचे बजेट बिघडणार

मुंबई - गणेशोत्सव तसेच आगामी सणासुदीचा काळ सुरू होण्याआधीच सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसणार आहे. उद्या म्हणजेच १ सप्टेंबरपासून दुधाच्या दरात ₹९ ची थेट वाढ करण्यात आली असून, यामुळे किचनचे बजेट बिघडणार आहे. दुधाचे दर अचानक का वाढले याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्रामध्ये 1 सप्टेंबरपासून दुधाचे दर 9 रुपयांनी महागणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, ही वाढ अचानक झालेली नाही; यापूर्वी 11 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील दूध उत्पादक आणि प्रक्रिया महासंघाने गाय आणि म्हैस दोन्हीच्या दुधाच्या दरात ₹2 ने वाढ केली होती. त्यानंतर आता थेट ₹9 ची मोठी वाढ जाहीर करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

महागाईच्या आघाडीवर सध्या तरी सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही. 'CRISIL' या रेटिंग एजन्सीनुसार, चालू आर्थिक वर्षात दुधाचे दर 4 ते 5 टक्क्यांनी आणखी वाढू शकतात. कंपन्या ही वाढ एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करतील. तसेच तूप, पनीर, दही आणि लोणी यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही 5 ते 6 टक्क्यांची वाढ होऊ शकते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg