loader
Breaking News
Breaking News
Foto

देव-घैसास-कीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) खडक संग्रहालयाला भेट

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर कला,वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या भूगोल विभागामार्फत गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) भूगोल विभागातील खडक संग्रहालयाला भेट दिली. या शैक्षणिक क्षेत्रभेटीत तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी संग्रहालयातील विविध खडक, त्यांचे प्रकार, पोत, रंग, रचना याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच विविध प्रकारच्या खडकांची निर्मिती प्रक्रिया आणि त्यानुसार खडकांमध्ये आढळणारी वैशिष्ट्ये याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे खडक हाताळता आले त्यांच्या रचनेनुसार खडकांची निर्मिती तसेच भौगोलिक प्रदेशानुसार खडकांच्या रचनेतला बदल या खडकांच्या नमुन्यावरून समजून घेता आला. यामुळे या क्षेत्रभेटीमुळे वेगवेगळ्या खडकांच्या मिळालेल्या माहितीमधून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अधिक भर पडली आणि याबद्दल आवड आणि उत्सुकता निर्माण झाली.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमाचे आयोजन भूगोल विभाग प्रमुख सहा. प्रा. ऋतुजा भोवड व सहा. प्रा. वैष्णवी शेवडे यांनी केले. तसेच उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या. मधुरा पाटील यांचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg