loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेचा रविंद्र तथा अण्णा सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

रत्नागिरी - श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी, पाली संचलित डी. जे. सामंत इंग्लिश मीडिया स्कूल, लांजा आणि रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शालेय स्तरावरच खेळाची आवड निर्माण करण्यासाठी आयोजित ‘लांजा तालुका मर्यादित भव्य आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धा’ या स्पर्धेचा शुभारंभ आज संस्थेचे अध्यक्ष रविंद्र तथा अण्णा सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी उपस्थित राहून बालस्पर्धकांना प्रोत्साहन देत त्यांचे कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांनाना. उदय सामंत ह्यांनी आज सहभागी झालेले छोटे खेळाडू हेच उद्याचे भविष्य आहेत. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून चालत नाही, तर शरीराने आणि मनाने तंदुरुस्त असणे आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत गरजेचे आहे. खेळांमुळे मुलांमध्ये शिस्त, जिद्द, संघभावना आणि पराभवाने न खचता पुन्हा उभे राहण्याची जिद्द निर्माण होते. आज या मॅरेथॉनमध्ये धावणारा प्रत्येक बालस्पर्धक विजेता आहे. कोणी पहिले आले किंवा कोणी दुसरे आले, हे महत्त्वाचे नाही; तर या स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेणे हेच त्यांचे सर्वात मोठे यश आहे.

टाईम्स स्पेशल

या क्रीडा सोहळ्यास आमदार किरण भैय्या सामंत यांच्यासमवेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्या अपूर्वा सामंत, लांजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सावली कुरुप, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, गटनेते योगेश कावतकर, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, पं.स. सदस्य उमेश पत्की, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह लांजा तालुक्यातील विविध शाळांचे बालस्पर्धक, पालक, शिक्षक आणि मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg