loader
Breaking News
Breaking News
Foto

देव्हारे-वडवली-आतले मार्गावर बिबट्याचा संचार

मंडणगड (प्रतिनिधी) - देव्हारे-वडवली-आतले शेवरे मार्गावर बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्री तसेच दिवसा ढवळ्या देखील बिबटयाचे लोकांना दर्शन होत असल्याने रानात गुरे चारण्यासाठी तसेच शेती आणि फळ बागांमध्ये कामाला जाण्यर्‍या शेतकर्‍यांत भितीचे वातावरण आहे. हा मार्ग सकाळपासूनच अगदी रात्रौपर्यत रहदारी असलेला असा एक महत्वाचा रस्ता आहे. अशा या रस्त्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून रात्रीच्या वेळेस चक्क बिबट्या बिनधास्तपणे वावर करताना अनेकांनी अनेकदा पाहिले आहे. वावरणार्‍या बिबटयाचे प्रतिबिंब काहींनी तर आपल्या मोबाईलमध्ये टीपले आहे. त्यामुळे त्याला बिबट्याच्या वावर असलेल्या पुष्टी मिळाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या पंधरा दिवसांपासून बिबटयाचा येथे वावर असून अजूनही पाळीव प्राणी तसेच मनुष्य हानी करण्याचा येथे प्रकार घडलेला नसला तरी अनेकांच्या प्रत्यक्ष दृष्टीस बिबट्या पडल्याने येथील शेतकर्‍यांना आपल्या रानात कामासाठी जाण्यास तसेच फळ बागायतदार आणि विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी भिती वाटत आहे. त्यामुळे मनुष्यप्राणी अथवा पाळीव प्राण्यांची हानी होण्याआधीच बिबटयाला पिंजरा लावून वन विभागाने पकडून येथील लोकांच्या मनात घर करून बसलेली भिती दूर करावी अशी मागणी येथील रहीवाशांकडून केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg