loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षणात दमदार भरारी; ३० विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रवेश

खेड (प्रतिनिधी) : रोटरी प्रतिष्ठानच्या खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नीट-२०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात दमदार पाऊल ठेवले आहे. नीट-२०२६च्या पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रियेत शाळेच्या तब्बल ३० विद्यार्थ्यांना विविध शासकीय व नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. यामध्ये १९ विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला असून, पहिल्याच फेरीअखेर एकूण ३० विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांना मुंबईतील K.E.M. हॉस्पिटल अँड G.S. मेडिकल कॉलेज, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज, सायन, तसेच कोल्हापूर, सातारा, मिरज, रत्नागिरी, वाशिम, जालना, हिंगोली, अलिबाग, सिंधुदुर्ग, नागपूर, धुळे, पुणे, जालना, कर्जत, कुडाळ आदी ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे. शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये श्लोक हरवांडे, सिद्धी शेलके, तनिषा चव्हाण, अथर्व क्षीरसागर, आयुष वाजे, समृद्धी लवकेर, आसावरी पाटील, मृदुल घाटे, इरा कदम, श्रेया गुरसाळे, एकस्नोर कौर, प्रक्षालिनी नाईकवाडे, तन्मय आखाडे, अनुष्का जैन, ईशा पवार, सार्थक जाधव, रिया चिपळूणकर, समृद्धी कुदळकर, ध्रुव पाटील, अर्जुन जाधव, तृप्ती कुळये, तीर्था वैद्य, शर्वरी घाडगे, अवधेशकुमार मेहता, ध्रुव साळवी, ओम तोडकरी, मिकदाद कालसेकर, इफ्रा मसीहुद्दीन, सृष्टी तेटांबे आणि सैफ देशमुख यांचा समावेश आहे.

टाईम्स स्पेशल

या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे खेड परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे हे यश प्रेरणादायी ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरी प्रतिष्ठान, शाळेचे शिक्षक, पालक आणि हितचिंतकांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यात हे विद्यार्थी उत्कृष्ट डॉक्टर म्हणून समाजाची सेवा करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg