loader
Breaking News
Breaking News
Foto

कसई दोडामार्ग नगरपंचायतवतीने गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - कसई दोडामार्ग नगरपंचायतवतीने शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी आगामी गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत मध्ये नियोजन संदर्भात बैठक पार पडली. चारही रस्त्यावर कशा पद्धतीने नियोजन करणे, तसेच बाजारपेठेमध्ये बसणारे फिरते व्यापारी, भाजीपाला, विक्री बाबत तसेच रिक्षा थांबा, एस.टी. बस पार्किंग, वाहने पार्किंग, तसेच गणेश चतुर्थी काळात अवजड वाहने वाहतूक नियोजन बाबत चर्चा करून नंतर दोडामार्ग बाजारपेठेमध्ये व्यापार्‍यांनी दिड ते तीन मीटर अंतरावर दुकाने लावणे याबाबत आखणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देवीदास गवस, मुख्य कार्यकारी अधिकारी संकेत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, प्रणय मोरजकर, एस टी विभाग कंट्रोल प्रमुख राजन धर्णे, तसेच व्यापारी संघ अध्यक्ष सागर सिरसाट, रिक्षा चालक, आरोग्य कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg