रत्नागिरी (जमीर खलफे) - लाडक्या गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलेले असताना, रत्नागिरी शहरात ‘श्री रत्नागिरीचा राजा’चा भव्य आगमन सोहळा प्रचंड उत्साहात, जल्लोषात आणि अलोट जनसागराच्या साक्षिने पार पडला. गगनाला भिडणारा ढोल-ताशांचा गजर, आसमंतात झालेली गुलालाची मुक्त उधळण आणि तरुणाईच्या अफाट ऊर्जेने संपूर्ण रत्नागिरी शहर दुमदुमून गेले होते. या ऐतिहासिक आणि देखण्या आगमन सोहळ्याला रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन बाप्पाचे मनोभावे स्वागत केले आणि सर्व रत्नागिरीकरांना आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच भव्यता प्राप्त झाली होती. यंदाच्या आगमन मिरवणुकीचे सर्वात मोठे आणि खास आकर्षण ठरली ती म्हणजे ‘द बॉम्बे हुपर गर्ल’ नावाने प्रसिद्ध असलेली कलाकार शिवानी धोपावकर. शिवानीच्या उपस्थितीने या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात एक वेगळीच रंगत भरली. बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहात शिवानीने आपल्या हुपर कलेची अत्यंत अप्रतिम, लयबद्ध आणि थक्क करणारी प्रात्यक्षिके सादर केली. तिच्या या अनोख्या कलाविष्काराला उपस्थितांनी, विशेषतः तरुणाईने, टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. शिवानीने आपल्या सहज सुंदर सादरीकरणाने उपस्थित सर्व रत्नागिरीकरांची मने जिंकून घेतली.
मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर भगवे झेंडे, रोषणाई आणि आबालवृद्धांचा अमाप उत्साह पाहायला मिळत होता. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय आणि चैतन्यमय झाले होते. रत्नागिरीतील या दिमाखदार सोहळ्याने आगामी गणेशोत्सवाच्या आनंदाची नांदी दिली असून संपूर्ण शहरात सध्या केवळ आणि केवल बाप्पाच्या आगमनाचीच चर्चा रंगली आहे.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.