loader
Breaking News
Breaking News
Foto

गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानचा १५ वा सार्वजनिक दहीहंडी उत्सव श्री धावीरदेव मंदिर पटांगणात ,५ सप्टेंबरला अभिनेते भूषण कडू यांची प्रमुख उपस्थिती

म्हसळा: गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे म्हसळा येथे आयोजित करण्यात येणारा १६ वा भव्य-दिव्य सार्वजनिक दहीहंडी उत्सव २०२६ यंदा शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी ठीक संध्याकाळी ५:०० वाजता म्हसळा येथील श्री धावीरदेव मंदिर पटांगण येथे मोठ्या उत्साहात रंगणार आहे. यंदाच्या या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध हास्यजत्रा फेम, सिनेअभिनेते श्री भूषणजी कडू यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. ५ थर लावणाऱ्या गोविंदांना ₹११,१११, सन्मानचिन्ह आणि मानाची 'भीम गदा' देण्यात येणार आहे. म्हसळा शहरातील गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदा प्रतिष्ठानच्या वतीने हा विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे. यशस्वीरीत्या ५ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला ₹११,१११/- रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि मानाची 'भीम गदा' देऊन गौरविण्यात येणार आहे. यंदाचा हा उत्सव खालील तीन प्रमुख विषयांना वाहून घेण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव काळ (स्वातंत्र्याची ७९ वर्षे) श्रीशिवराज्याभिषेक शक ३५३ प्रारंभ आणि तंटामुक्त गोविंदा. या दहीहंडी महोत्सवात म्हसळा परिसरातील विविध समाजांची गोविंदा पथके सहभागी होत आहेत, ज्यामध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग आहे, श्रीगणेश पेठ गोविंदा पथक, संत श्री गोरोबा काका कुंभार समाज गोविंदा पथक, श्रीराम पेठकर समाज गोविंदा पथक, मारवाडी-राजस्थानी समाज गोविंदा पथक, महिला गोविंदा पथक, आदिवासी समाज गोविंदा पथक सहभागी होणार आहेत.

टाइम्स स्पेशल

गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान वर्षभरात शिवजयंतीनिमित्त रायगडाहून मशालज्योत आणणे, गडसंवर्धन व स्वच्छता, नाणी व शस्त्र प्रदर्शन, रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यांसारखे विविध सामाजिक व ऐतिहासिक उपक्रम राबवत असते. म्हसळा व परिसरातील सर्व नागरिक आणि गोविंदा प्रेमींनी ५ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता श्री धावीरदेव मंदिर पटांगणात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून तथा गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg