loader
Breaking News
Breaking News
Foto

मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चिपळूण-संगमेश्वर पदाधिकार्‍यांसोबत बैठक

रत्नागिरी : आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ’मातोश्री’ निवासस्थानी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकार्‍यांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मतदारसंघातील पक्षाची स्थिती, आगामी रणनीती आणि स्थानिक पातळीवरील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला चिपळूण-संगमेश्वरमधील अनेक प्रमुख आणि दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे, जिल्हा परिषद सदस्य नेहा माने, विशाखा कुवळेकर, बाळा कदम आणि छोट्या गवाणकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीदरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडली. राममंदिर चोरीचा मुद्दा उचलून धरत ’राम रक्षा आंदोलन’ छेडण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ताशेरे ओढत, पूर्वीची भाजप राहिली नसून ती आता पूर्णपणे व्यावसायिक झाली आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. स्थानिक पदाधिकार्‍यांनी पक्षांतर्गत काही महत्त्वाचे प्रश्न आणि गार्‍हाणी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. पक्षात नवीन प्रवेश करताना किंवा कोणालाही प्रवेश देताना स्थानिक पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले पाहिजे, अशी आग्रही भूमिका काही पदाधिकार्‍यांनी मांडली. तसेच, मुंबईतील पदाधिकारी येतात, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो टाकतात आणि निघून जातात, अशा स्वरूपाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत अशा प्रकारे पक्ष व संघटना कशी वाढेल? असा सवाल पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला.

टाईम्स स्पेशल

बाळ मानेने काय केलं, ते पाहिले पाहिजे, असा सूर देखील बैठकीत उमटला. या सर्व चर्चेदरम्यान, निष्ठावंत कार्यकर्त्यांना नेहमी विश्वासात घेऊनच सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले जावेत, असा सूर या बैठकीत प्रकर्षाने निघाल्याचे पाहायला मिळाले. पक्षप्रमुखांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आता कधीही मातोश्रीवर या, असे म्हणत संवाद सुरू ठेवण्याचे आवाहन केले. या बैठकीमुळे चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील आगामी राजकीय हालचालींना वेग येणार असून स्थानिक पातळीवरील गटतट आणि संघटन मजबुतीकरणाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg