देवळे ( प्रकाश चाळके ) मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने आयोजित केलेल्या युवा महोत्सवाच्या ५८व्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि ५९व्या आंतरमहाविद्यालय युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात श्री. विलास विजय रहाटे यांना सलग ४व्या वर्षी इंद्रधनुष्य महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवा महोत्सव, पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सव व राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सव स्पर्धेतील मुंबई विद्यापीठाच्या 'फाईन आर्ट' टीमला मार्गदर्शन करून उत्तम यश प्राप्त करून दिल्याबद्दल सुप्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध हिंदी अभिनेते बोमन इराणी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. (डॉ.) रवींद्र कुलकर्णी, व्हॉइस चान्सलर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यांनी भूषवले, तर अतिथी म्हणून प्राचार्य (डॉ.) अजय भामरे, प्रो-व्हाईस चान्सलर, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आणि डॉ. प्रसाद कारंडे, रजिस्टार ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभासाठी विलास रहाटे यांनी बोमन इराणी यांची हुबेहूब रांगोळी साकारलेली होती. बोमन इराणी यांनी विलास रहाटे यांनी साकारलेली रांगोळी पाहताच क्षणार्धात एक्सलंट असे उद्गार काढले. विलास रहाटे यांच्याशी बोमन इराणी यांनी संवाद साधताना सांगितले की, ही रांगोळी जर घरी घेऊन जाता आले असते, तर मी ती लगेच घरी घेऊन गेलो असतो. विलास रहाटे यांच्याकडून यावेळी बोमन इराणी यांनी रांगोळी कलेतील बारकावे समजून घेतले.
मुंबई विद्यापीठाच्या अनेक कार्यक्रमात विलास रहाटे यांनी गेली अनेक वर्ष अनेक दिग्गजांच्या हुबेहूब रांगोळ्या साकारल्या आहेत. यामध्ये अभिनेते, राजकारणी, खेळाडू, उद्योगपती, राज्यपाल, राज्यातील व केंद्रातील मंत्री, विविध क्षेत्रातील कलाकार, शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ, अवकाश यात्री यांचा समावेश आहे. विद्यार्थी दशेत विलास रहाटे यांनी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या संघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले होते. तर गेली चार वर्ष विलास रहाटे मुंबई विद्यापीठाच्या फाईन आर्ट टीमची धुरा वाहत आहेत. विलास रहाटे यांना मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील व मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.