म्हसळा -रायगड : आगामी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने म्हसळा शहरातील कन्या शाळेच्या पटांगणात यंदा भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. म्हसळा तालुक्यात पहिल्यांदाच लाखाची दहीहंडी उभारण्यात येणार असून, मानाची हंडी फोडणार्या गोविंदा पथकाला तब्बल १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शनिवार ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून कन्याशाळा, म्हसळा शहर येथे हा उत्सव रंगणार आहे. दह्यात साखर, साखरेत भात, उंच दहीहंडी उभारून देऊ एकमेकांना साथ, फोडू हंडी लावून थरावर थर, जोशात साजरा करू दहीहंडी उत्सव २०२६ या घोषवाक्याने उत्सवाचे वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी विविध स्तरांवर बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. सात थरांसाठी २२ हजार २२२ रुपये, सहा थरांसाठी ११ हजार १११ रुपये आणि पाच थरांसाठी ५ हजार ५५५ रुपये रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नियोजन केले आहे. कार्यक्रमस्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच सहभागी गोविंदा पथकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
या भव्य उत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे, महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे तसेच कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार अनिकेत तटकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री स्नेहलता वसईकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या उत्सवाचे आयोजन भास्कर दाजी विचारे फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. म्हसळा तालुक्यातील तसेच परिसरातील जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी सहभागी होऊन दहीहंडी उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.