loader
Breaking News
Breaking News
Foto

कादवण ग्राम पंचायतीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी पांडुरंग सोंडकर यांची निवड

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील एक महत्त्वाची ग्राम पंचायत असलेल्या कादवण ग्राम पंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी येथील प्रभावशील व्यक्तिमत्व असलेल्या पांडुरंग सोंडकर यांची एकमताने ग्रामसभेत निवड करण्यात आली आहे. या त्यांच्या यशस्वी निवडीचे सरपंच राजेंद्र सोंडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन ग्राम पंचायतीच्या वतीने ग्रामसभेतच अभिनंदन केले. मंडणगड तालुक्यातील कादवण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा विषय पटलावर होता. यासाठी कादवण गावातील पांडुरंग ऊर्फ बाबा सोंडकर यांचे नांव एकमताने जाहीर करण्यात आले त्याला ग्रामसभेने सर्वानुमते मान्यता दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पांडुरंग सोंडकर यांची कादवण ग्राम पंचायतीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड जाहीर होताच सरपंच राजेंद्र सोंडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच सोंडकर म्हणाले कादवण गावात असलेली शांतता आणि सुव्यवस्था यापुढे देखील अबाधित राखण्यासाठी पांडुरंग सोंडकर आपल्या परीने महत्वाची भूमिका बजावतील याचा तसेच गावात तंटा बखेडा निर्माण झालाच तर तो आपल्या कौशल्याने मिटवण्यासाठी ते स्वतः पुढाकार घेऊन मंडणगड तालुक्यातील कादवण या गावाची तंटा विरहीत गाव म्हणून अगदी जिल्हा पातळीपर्यंत नाव होण्यासाठी प्रयत्न करतील त्यांच्या प्रयत्नांना गावाचीही तितकीच महत्त्वाची साथ मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

यावेळी उपसरपंच पुजा शिंदे, ग्रामसभेत ग्राम अधिकारी यांच्या अनुपस्थितीत शासनाने दिलेले सचिव मुंडे, ग्राम पंचायत सदस्या प्रतिभा निवेंडीकर, पोलिस पाटील विजय खैरे आदींसह ग्रामस्थ तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg