loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून परब कुटुंबीयांचे सांत्वन

मालवण (प्रतिनिधी) - मसुरे-मर्डे येथील रहिवासी तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सरोज शिवाजी परब यांच्या निधनाने परब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी रविवारी सायंकाळी मसुरे-मर्डे येथे परब कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सरोज परब यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच पालकमंत्री नितेश राणे यांनी परब कुटुंबीयांची भेट घेत दुःख व्यक्त केले. या दुःखद प्रसंगी आपण आणि संपूर्ण समाज परब कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषद सदस्या क्षमा हडकर, वेरली सरपंच धनंजय परब, घुमडे उपसरपंच राजू सावंत, मसुरेचे माजी सरपंच संदीप हडकर, माजी उपसरपंच राजेश गावकर, मालोंडचे माजी उपसरपंच जितेंद्र परब, राहुल परब, गणेश परब, उमेश माने, रोहेश गावकर, तात्या हिंदळेकर, पुरुषोत्तम शिंगरे, यासिन सय्यद आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg