loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा परिसरात गणेशोत्सवाची लगबग; मुर्तीशाळामध्ये गणेश मुर्तीवर अंतिम हात फिरविण्याचे काम सुरू

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असल्याने गणेशोत्सवाचे वेध लागले असुन भक्तगणामध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता आता शिगेला पोहचली असून, घराघरांमध्ये आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये तयारीची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. मुर्तीशाळामध्ये गणेश मुर्तीवर अंतिम हात फिरविण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. कोकणातील सर्वात मोठा सण गणपतीचा असल्याने चाकरमानी मंडळीही मोठ्या संख्येत घरी येतात. गणपती सण घरघरांमध्ये मोठ्या उत्साहात धार्मिक पध्दतीने साजरा केला जातो. तसेच घरांची स्वच्छता आणि सजावटीच्या तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे लांजा शहर परीसरात गणेशोत्सवाचे वातावरण निर्माण होत आहे. बाजारातही मखरे, ईकोफ्रेडली कागदी व लाकडी मखरे, एलईडी लाईट्स आणि कृत्रिम फुलांनी सजावटीच्या साहित्याने बाजापेठा फुलू लागल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg