loader
Breaking News
Breaking News
Foto

4 आणि 5 सप्टेंबरला पिरंदवणे येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे येथे, राजसत्तेचे मानकरी श्री. मिलिंद शांताराम जुवेकर यांच्या निवासस्थानी श्रावण कृष्ण अष्टमी ते श्रावण कृष्ण नवमी अर्थात ४ आणि ५ सप्टेंबर दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये ४ रोजी संध्याकाळी 6 वा.श्रीं वर अभिषेक होईल. रात्री ७.३० वा.आरती मंत्रपुष्प, रात्री ८.०० वाजता भजन आणि रात्री १०.३० वाजता ह. भ. प. शैलेश साने, देवरूख यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन रंगेल. त्यांना तबला साथ महेश आठल्ये करतील. दि ५ रोजी १० वा. बाळगोपाळांचे विविध खेळ, दहीहंडी फोडणे कार्यक्रम होतील. दु.१.०० वाजता महाप्रसाद होईल. या उत्सवानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमाना उपस्थित राहावे असे आवाहन मिलिंद जुवेकर यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg