loader
Breaking News
Breaking News
Foto

गुणवत्ता यादीत 'पाचेरी सडा नं. १' च्या विद्यार्थ्यांची उत्तुंग कामगिरी

आबलोली (संदेश कदम) - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत (स्कॉलरशिप) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाचेरी सडा नं.१ च्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. घोषित झालेल्या अंतिम गुणवत्ता यादीत शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी स्थान मिळवून शाळेच्या व परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या मध्ये परीक्षेत अर्णव आनंद काजरोळकर आणि मानवी अजित पंडये यांनी आपल्या कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट अभ्यासाच्या जोरावर जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत यश संपादन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या विद्यार्थ्यांनी पटकावलेल्या या यशामुळे पाचेरी सडा परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पंचायत समिती गुहागर येथे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. गटविकासाधिकारी शिंदे, गटशिक्षणाधिकारी गळवे, व पाचेरी आगर केंद्राचे माजी केंद्र प्रमुख विश्वास खर्डे सर्वांनी विद्यार्थांचे कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक तसेच मुख्याध्यापक संजय रामप्रसाद वाघ, सहकारी शिक्षक सचिन लबडे, किर्ती रुईकर व आनंद मुळे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. याबद्दल मुख्याध्यापक यांनी सर्व सहकारी शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक, ग्रामस्थ व पालकांकडून अर्णव आणि मानवीचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशात शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे भावी शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg