loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगरपालिका महिला सफाई कर्मचारी भगिनींसमवेत रक्षाबंधन स्नेहबंध कार्यक्रम उत्साहात संपन्न

खेड : लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे खेड नगरपालिका महिला सफाई कर्मचारी भगिनींसमवेत आयोजित करण्यात आलेला रक्षाबंधन स्नेहबंध कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम मुकादम लँडमार्क येथील लायन शम्सभाई मुकादम यांच्या प्रशस्त कार्यालयीन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. खेड नगरपालिकेच्या महिला सफाई कर्मचारी भगिनी वेळेत उपस्थित राहत कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन लायन्स क्लबचे खजिनदार ला. संदीप मोरे यांनी केले. यावेळी क्लबचे अध्यक्ष ला. अविनाश दळवी यांनी मनोगत व्यक्त करत महिला सफाई कर्मचारी भगिनींच्या समाजासाठी असलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर रक्षाबंधनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. सर्व महिला सफाई कर्मचारी भगिनींनी उपस्थित लायन सभासदांचे औक्षण करून त्यांना प्रेमाने राखी बांधली. या प्रसंगी निर्माण झालेले आपुलकीचे आणि स्नेहाचे वातावरण सर्वांच्या मनाला स्पर्शून गेले.विशेषतः ला. नईम चौगुले यांनी उत्साहाने राखी बांधून घेत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.या कार्यक्रमासाठी मैत्रीण लेडीज वेअरचे मालक ला. राकेश जैन यांनी सौजन्याने सर्व महिला सफाई कर्मचारी भगिनींना साडी भेट दिली, तर क्लबचे अध्यक्ष ला. अविनाश दळवी यांच्या हस्ते मिठाई बॉक्सचे वाटप करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

यावेळी महिला सफाई कर्मचारी भगिनींनीही मनोगत व्यक्त करत, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने सातत्याने दिलेल्या सन्मानाबद्दल व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील दुर्लक्षित घटकांप्रती क्लबने दाखविलेल्या जिव्हाळ्याच्या भावनेचे त्यांनी विशेष कौतुक केले.सदर कार्यक्रमास अध्यक्ष ला.अविनाश दळवी,आयपीडीजी ला. डॉ. वीरेंद्र चिखले, माजी अध्यक्ष ला. महेंद्रजी शिरगावकर, माजी अध्यक्ष ला. रोहन विचारे, खजिनदार ला. संदीप मोरे, ला. सागर करवा, ला. विनोद मोरे, ला. नईम चौगुले, ला. प्रवीण पवार, ला. डॉ. मरकड, ला. माणिक लोहार, ला. परेश चिखले, ला. प्रसाद (पप्पू शेठ) आदी लायन सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी खजिनदार ला. संदीप मोरे यांनी उपस्थित महिला सफाई कर्मचारी भगिनी तसेच सर्व लायन सभासदांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg