loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वरवासीय गवळी समाज सेवा संघ चिपळूणची नूतन कार्यकारणी जाहीर

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वरवासीय गवळी समाज सेवा संघ चिपळूण या सेवाभावी संस्थेची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. समाजाची एकजूट अधिक मजबूत करणे. सामाजिक बांधिलकी जोपासणे, शैक्षणिक प्रगतीला चालना देणे, तसेच विविध सेवाभावी उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने ही नूतन कार्यकारणी निवडण्यात आली आहे. सन २००७ मध्ये स्थापन झालेल्या या संघाचे संस्थापक भिकाजी बुवा चोगले असून समाजाच्या विविध प्रश्नांवर काम करताना सामाजिक, शैक्षणिक, व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाज बांधवांना एकत्र आणण्याचे कार्य या संघाच्या माध्यमातून सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नूतन कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी उमेश संभाजी महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आदी आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी विनोद वरेकर, सेक्रेटरी विजय सखाराम भोजने, सह सेक्रेटरी संतोष मिरगल, खजिनदार जयवंत मिरगल व सहखजिनार सुनील लटके यांची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्धी प्रमुख म्हणून जितेंद्र महाडिक, महेश भोजने यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, सदस्य सल्लागार रामदास भोजने, महेश महाडिक, रमाकांत कांबळे, चंद्रकांत कांबळे, चंदू मामा भोजने, विजय कांबळे आदी सदस्य सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सेवाभावी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी ही नूतन कार्यकारणी निश्चित मोलाचे योगदान देईल, अशा प्रकारचा विश्वास समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

एकीमध्ये शक्ती असते सेवेमध्ये समाधान आणि समाज हितामध्ये खरे यश असते. समाजाच्या उज्वल भविष्याची खरी ताकद असून भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशाचा आदर्श डोळ्या समोर ठेवून समाजसेवेचे कार्य निस्वार्थ भावनेने व एकजुटीने तसेच प्रामाणिकपणाने पुढे नेण्याचा निर्धार नूतन कार्यकारणीच्या वतीने करण्यात आला. संबंधित नूतन कार्यकारणीवर समाजातून अभिनंदनचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg