मालवण दि प्रतिनिधी : येथील सतीश आचरेकर मित्रमंडळातर्फे मालवण बंदर जेटी येथे आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची भव्यदिव्य राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेत अंतिम सामन्यात पंकज सादये यांना नमवत शैलेश नाईक यांनी विजयाला गवसणी घालत प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. या स्पर्धेत मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, खारेपाटण, गोवा आणि सिंधुदुर्गातून तब्बल २४ संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या सुरुवातीला कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते स्पर्धेचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार राणे यांचा सत्कार सतीश आचरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, अशोक सावंत, संदीप परब पंकज सादये, बबन शिंदे यांचे मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार राणे यांनी या स्पर्धेला शुभेच्छा देत दरवर्षी ही स्पर्धा व्हावी, असे सांगितले.
या स्पर्धेत २४ संघांनी सहभाग घेतला होता. हे सामने दोन गटामध्ये खेळविण्यात आले. दोन्ही गटातील सामने रोमहर्षक व अटीतटीचे झाले. या स्पर्धेत शैलेश नाईक यांनी आपले एकहाती वर्चस्व गाजविले. अलिबाग येथील शैलेश नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावत रोख रक्कम १,०१,१११ रुपये व आकर्षक चषकावर आपले नाव कोरले. तर आसिफ विकी यांनी द्वितीय क्रमांक पटकावित रोख ५१,१११ रुपये व आकर्षक चषक, पंकज सादये यांना तृतीय क्रमांक रोख रक्कम २१,१११ व आकर्षक चषक, तर मनोज मयेकर यांच्या संघाने चतुर्थ क्रमांक रोख रक्कम ११,१११ व आकर्षक चषक पटकावले. तसेच उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ म्हणून अलिबाग येथील वर्धान घरत यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. उत्कृष्ट प्रहार गोवा येथील डॉमनिक (पंकज सादये) याला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली, आकर्षक नारळ खारेपाटण येथील तुषार कोळसुलकर यांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी सतीश आचरेकर यांनी सांगितले की, आजपर्यंत राजकीय क्षेत्रात सहभाग घेण्यासाठी कोणताही कार्यक्रम करत नाही तर ही एक हौस आहे. लहान असल्यापासून नारळ खेळत आहे आणि ही हौस मोठी व्हावी. दिनेश चांदेरकर असतील किंवा अन्य तर आम्ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी भरपूर मज्जा करू आणि आमचे जे मित्रमंडळ आहे त्यांना पण याचा आनंद लुटता यावा यामधून ही स्पर्धा निर्माण झाली. आज मालवणवासिय देखील या स्पर्धेचा आनंद लुटताना दिसत आहेत. स्पर्धेमध्ये अतिशय तुल्यबळ असे संघ सहभागी झाल्याने या स्पर्धेत रंगत आली. या स्पर्धेसाठी आनंद आचरेकर, तुषार मसुरकर व नीलेश वेर्णेकर, मॉन्टी नार्वेकर यांचा मोलाचा वाटा आहे.यावेळी नीलेश वेर्णेकर, संजय घरत, सागर तिगडी, आनंद आचरेकर, मोहन आचरेकर, वैभव मयेकर, मॉन्टी नार्वेकर, मनोज मयेकर, निशाद हिरनाईक, मोहन घरत, बाबा जोशी, विकी चोपडेकर, आशिष नार्वेकर, संजय सारंग, विपुल राऊळ, शैलेश नाईक, मोहन म्हात्रे, शंकर अण्णा घरत, गुणेश हडकर, दिप नार्वेकर, तुषार नार्वेकर, विराज पिळणकर, पप्या कीर, मानस किर, संकेत हळदणकर, रॉयल ब्रदर्स मित्रमंडळाच्या वतीने सतीश आचरेकर, निलेश वेर्णेकर यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे कार्यकर्ते दर्पण सादये, कुलराज बांदेकर, रॉनी फर्नांडिस, राज जाधव, हर्ष मिठबावकर, ओंकार यादव, सचिन साळगावकर, कुणाल मालवणकर, भूषण पडवळ, यज्ञेश करंजेकर, कल्पेश मसुरकर, मंदार अंधारी, मिथील हिंदळेकर, रेगन नहोना, भावेश पारकर, फ्रान्सिस नहोना, वेदांत मालवणकर, मॉरीस फर्नांडिस, योगेश मेस्त्री उपस्थित होते.स्पर्धेचे समालोचन सातारा येथील श्रावणी पाटील व मालवण येथील अक्षय मालवणकर यांनी केले.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.