loader
Breaking News
Breaking News
Foto

धर्मापेक्षा भारतीयत्वाची भावना जपणे काळाची गरज - ॲड. संदीप निंबाळकर

सावंतवाडी,: धर्म वेगवेगळे असले तरी प्रत्येक धर्माची शिकवण प्रेम, बंधुभाव, शांतता आणि माणुसकीचीच आहे. मात्र, एकमेकांच्या धर्मातील चांगल्या गोष्टी आणि शिकवण समजून न घेतल्याने तसेच चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवल्याने आज समाजात धार्मिक वितंडवाद वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या धर्माचे आचरण घराच्या आत अभिमानाने करावे; मात्र घराबाहेर पडल्यानंतर ‘आपण सर्वप्रथम भारतीय आहोत’ ही भावना मनात रुजविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ॲड. संदीप निंबाळकर यांनी केले. मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या वतीने पैगंबर मोहम्मद जयंतीनिमित्त सावंतवाडी शहरातील विविध स्तरावर काम केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, देवा टेमकर, पुंडलिक दळवी, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, भुवन नाईक, कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे, ॲड. ईजाज नाईक, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, समीरा खलील, रमेश बोंद्रे, ॲड. ऋषिकेश पाटील, विजयालक्ष्मी चिंदक, महेश परूळेकर, नाजली नाईक, मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक मेमन, चांदमैनुद्दीन करोल, मोहम्मद अरिफ करोल, मोहम्मद शकील खान, जमिल अकबानी, शकील शेख, अनिस बिजली, बशीर पडवेकर, नईम मेमन आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी निंबाळकर पुढे म्हणाले की, विविध धर्मांच्या शिकवणीतील साम्य अधोरेखित करत सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे महत्त्व स्पष्ट केले. इस्लाम धर्म प्रेम, बंधुभाव आणि शांततेचा संदेश देतो. हिंदू धर्मातील श्रावण बाळाची कथा आई-वडिलांच्या सेवेची शिकवण देते, तर बौद्ध धर्म करुणा व शांततेचा मार्ग दाखवतो. ख्रिश्चन धर्मासह सर्वच धर्मांचा मूलभूत उद्देश समाजात प्रेम, माणुसकी आणि सलोखा निर्माण करणे हाच आहे, असे त्यांनी सांगितले. आजच्या काळात धार्मिक मतभेदांना खतपाणी घालण्यापेक्षा विविध धर्मांची सकारात्मक शिकवण समजून घेऊन परस्परांचा आदर करण्याची गरज आहे. धर्माची ओळख जपतानाच भारतीयत्वाची व्यापक भावना अधिक बळकट झाली, तर समाजातील तणाव कमी होऊन एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक मजबूत होईल, असेही ॲड. निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी रान माणूस प्रसाद गावडे यांनी पर्यावरणाचे महत्त्व विशद केले. या ठिकाणी जमिनी विकू नका, असे आवाहन करत पर्यावरणचा रास करणाऱ्या प्रकल्पांना या ठिकाणी थारा देऊ नका. तसेच बाहेरील व्यक्तींना त्या ठिकाणी जमिनी खरेदीच्या संधी देऊ नका, असे आवाहन केले. तसेच उद्याची पिढी घडण्यासाठी कोकणचे कोकणपण टिकण्यासाठी निसर्ग आणि पर्यावरण राखण्यासाठी सर्व धर्मीयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावे त्यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक एजाज नाईक यांनी सर्व धर्म समभावाबद्दल माहिती दिली. त्या ठिकाणी जिल्ह्यात सर्व धर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांदतात ही कौतुकाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमी करण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या छोट्या स्पर्धकांनी उपस्थित त्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg