रत्नागिरी : चित्रकला शिक्षक म्हणून अनेक पिढ्या घडवणारे आणि मुलींच्या शिक्षणासाठी तळमळीने काम केलेले, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या, गोदुताई जांभेकर महिला विद्यालयातील निवृत्त शिक्षक विलासराव इंदुलकर यांचे २४ ऑगस्ट 2026 रोजी नाचणे येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. बालपण अत्यंत खडतर आणि प्रतिकूल असतानाही छोटी-मोठी कामे करत त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. कलेवरील अपार प्रेम, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी मुंबईतील नामांकित जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून कला शिक्षण पूर्ण केले. मुंबईत असताना त्यांनी चित्रपटांसाठी पोस्टर्स तयार करण्याचे कामही केले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी च्या गोदुताई जांभेकर महिला विद्यालयात चित्रकला शिक्षक म्हणून ते सन 1970 साली रुजू झाले, त्या सुरुवातीच्या काळात रत्नागिरीत मुलींच्या शिक्षणाबाबत पुरेशी जागरूकता नव्हती. त्या काळात त्यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. बाबुराव जोशी आणी कै. मालतीबाई जोशी यांच्या प्रेरणेतून, आपल्या सहकाऱ्यांसह घरोघरी जाऊन पालकांमध्ये मुलींच्या शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण केली. त्यांच्या या सामूहिक अथक प्रयत्नांमुळे हळूहळू मुलींच्या शाळेतील प्रवेशाचे प्रमाण वाढू लागले.
आज त्या काळातील अनेक विद्यार्थिनी समाजाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. आपल्या आयुष्यातील यशस्वी वाटचालीत इंदुलकरसरांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि संस्कार यांचा वाटा असल्याचे त्या आजही कृतज्ञतेने सांगतात. गेले काही महिने ते आजारी होते. काही दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले. या आजारपणातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी निवृत्त शिक्षिका शुभांगी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.