loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्जत बस आगारात खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवाशांची चिखलातून वाटचाल!

कर्जत (जयेश जाधव): कर्जत एसटी बस आगाराची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून, संपूर्ण आगार परिसरात मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसामुळे आगारातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, प्रवाशांसह विद्यार्थ्यांना चिखल व पाण्यातून मार्ग काढत बसमध्ये चढावे लागत आहे. आगार परिसरातील विविध भागांमध्ये मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक तसेच पादचार्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये चिखल साचल्याने बसपर्यंत पोहोचणेही प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयासाठी बस पकडताना या अस्वच्छ आणि गैरसोयीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बस उभ्या करण्याच्या जागेचीही दुरवस्था झाली असून आगारात अनेक एसटी बस चिखल व खड्ड्यांच्या परिसरात उभ्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. बसची ये-जा सुरू असताना चिखल उडण्याची शक्यता असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी स्पष्टपणे न दिसल्यास अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या गंभीर परिस्थितीबाबत कर्जत आगार व्यवस्थापक पृथ्वीराज भुताळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आगारातील खड्डे बुजविण्यासाठी खडी व अन्य आवश्यक मटेरियल जागेवर आणून ठेवण्यात आले आहे; मात्र काम करण्यासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने दुरुस्तीचे काम रखडले आहे, अशी माहिती दिली.

टाईम्स स्पेशल

प्रशासनाकडून दुरुस्तीचे साहित्य उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात आगारातील खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्याची समस्या कायम असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे उपलब्ध साहित्याचा वापर करून काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. कर्जत बस आगारासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक वाहतूक केंद्राची अशी अवस्था असताना संबंधित प्रशासनाकडून आवश्यक दुरुस्ती व देखभालीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यातील परिस्थिती लक्षात घेता आगारातील खड्डे बुजवून पाण्याचा निचरा करण्याची तातडीची गरज आहे. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी आणि विद्यार्थी कर्जत बस आगाराचा वापर करतात. त्यामुळे आगारातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करून खड्डे बुजवावेत, चिखल व पाण्याचा निचरा करावा आणि प्रवाशांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg