पनवेल : शिवसेना पनवेल उपजिल्हाप्रमुख परेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रमुख उपस्थिती लावली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भरतशेठ गोगावले यांनी शिवसेना पनवेल शहर मध्यवर्ती कक्षाला भेट देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेत स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी परेश पाटील यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचे कौतुक करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
परेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत असंख्य गरजू आदिवासी महिलांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. गरजू महिलांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. परेश पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना स्थानिक पातळीवर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यात कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे पालकमंत्री गोगावले यांनी नमूद केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र यादव, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, महिला तालुकाप्रमुख मंदाताई जंगले, उपमहानगरप्रमुख सचिन मोरे, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, खारघर शहरप्रमुख प्रसाद परब, तळोजा शहर संघटक राहुल कदम, महिला उपतालुकाप्रमुख स्मिताताई भोईर, नैना सुरते, युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, युवासेना विधानसभा संपर्कप्रमुख अभिनय सोमण, युवासेना खारघर शहरप्रमुख तौफिक बागवान, गुलाब बागवान, मंदार काणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमामुळे कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी पनवेल महानगरपालिका कार्यालयाला भेट देऊन तेथील अधिकारी यांच्याशी चर्चा केली.

































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.