loader
Breaking News
Breaking News
Foto

सहोदया कोकण विभाग आणि मानेज इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सीटी आणि एआय या विषयावर अभिनव शिक्षक कार्यशाळा

रत्नागिरी, - शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेऊन प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित मानेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज ’कॉम्प्युटेशनल थिंकिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावर विशेष प्रेझेंटेशन आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवातीला प्रमुख पाहुणे कार्तिक गोयल, श्याम पटेल, उमंग अगरवाल, मानेज इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सुमन अरोरा आणि जिंदल विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सोनिया सेठी, यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापिका सुमन अरोरा यांच्या हस्ते छोटे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर प्रमुख पाहुणे कार्तिक गोयल यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना सीटी आणि एआय बद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आता फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एआय सारख्या विषयांचे ज्ञान देणे गरजेचे आहे. या कार्यशाळेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील १४ नामांकित शाळांमधील शिक्षकांनी सहभाग घेतला होता. सीबीएई बोर्डाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना सीटी आणि एआयचे ज्ञान देणे आवश्यक झाले आहे, त्याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम घेण्यात आला.

टाईम्स स्पेशल

विविध शाळांतील शिक्षकांनी सीटी आणि एआय या विषयावर अत्यंत उपयुक्त प्रेझेंटेशन सादर केले. त्यांनी अभ्यासक्रमात दडलेले संगणकीय शिक्षण, ’नेचर टू प्लांट’ मधून निसर्ग आणि तंत्रज्ञानाचा संबंध उलगडला. ’थिंक, ब्रेक अँड सॉल्व्ह’ सारख्या कृतींमधून विद्यार्थ्यांचे तर्कशक्ती व समस्या सोडवण्याचे कौशल्य कसे वाढते हे दाखवले. तसेच ’वी नीड एआय, कॅन स्टुडन्टस् बीकम ह्युमन एआय?’ या विषयावर चर्चा करताना शिक्षकांनी एआय हे मानवाचा पर्याय नसून त्याला सक्षम करणारे साधन असल्याचे प्रभावीपणे मांडले. त्याचबरोबर वर्गात एआयचा वापर करून गणित, विज्ञान आणि भाषा हे विषय अधिक सोपे कसे करता येतील, यावर आपले विचार मांडले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मानेज इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सुमन अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीरित्या केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक पारिजात वाघाटे आणि सानिका चाळके यांनी केले, तर शाळेच्या शिक्षिका तृष्णाली शिगवण यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg