loader
Breaking News
Breaking News
Foto

कोदवलीतील हर्डी वरची वाडीच्या ग्रामस्थांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

राजापूर : राजापूर तालुक्यातील कोदवली गावातील हर्डी वरची वाडी येथील ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कोदवली परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढली असून, ग्रामस्थांच्या सहभागामुळे आगामी काळात पक्षाचे काम अधिक जोमाने करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. हर्डी वरची वाडी येथील ग्रामस्थांनी स्थानिक विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि गावाच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने एकत्रितपणे काम करण्याच्या उद्देशाने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला.पक्षप्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांचे आमदार किरण सामंत यांनी स्वागत करून त्यांचे पक्षात मनापासून अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आमदार किरण सामंत यांनी नव्याने शिवसेनेत सहभागी झालेल्या ग्रामस्थांशी संवाद साधला. गावातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणणे, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात विकासकामांना गती देण्यासोबतच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, शेती तसेच अन्य नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला जात असल्याचेही आमदार सामंत यांनी यावेळी नमूद केले. हर्डी वरची वाडी येथील ग्रामस्थांच्या या पक्षप्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नव्याने पक्षात दाखल झालेल्या ग्रामस्थांनी पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ राहून गावाच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्या सदस्यांचे स्वागत केले. ग्रामस्थांच्या या सहभागामुळे कोदवली परिसरातील संघटन अधिक मजबूत होऊन आगामी काळात विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.कोदवली गावातील हर्डी वरची वाडी येथील ग्रामस्थांचा हा सामूहिक पक्षप्रवेश राजापूर तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून, स्थानिक पातळीवर पक्षाला मिळणारा वाढता प्रतिसाद यामुळे अधोरेखित झाला आहे. यावेळी राजापूर तालुक्याच्या सभापती नंदनी कदम, तालुकाप्रमुख दीपक नागले, ॲड.यशवंत कावतकर, नगरसेवक दिलीप चव्हाण दिलीप आमरे योगेश नकाशे गावकर पंढरीनाथ जड्यार आधी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg