loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री लक्ष्मी नारायण मंदिरात पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - चिपळूणातील बापट आळीतील श्री लक्ष्मी नारायण देवस्थान चिपळूण येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव व श्रीकृष्ण व्याख्यानमाला सुरु आहे. याचं उत्सवानिमित्त श्री लक्ष्मी नारायण पाठांतर स्पर्धा झाली.तीन गटात झालेल्या ह्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पहिली दुसरी चा पाहिला गट होता. या गटासाठी श्री मनाचे श्लोक १ ते १५ श्रीसमर्थ रामदास स्वामीकृत असा विषय होता. या गटात २९ स्पर्धक सहभागी झाले होते. तर दुसरा गट इयत्ता तिसरी व चौथी साठी होता. या गटाला गीताई चा १२ वा अध्याय पठण होते. या गटात ९ स्पर्धक सहभागी झाले होते. पाचवी ते सातवी अशा मोठ्या व तिसऱ्या गटाला प्रमाण- कृष्णाजी नारायण आठल्ये हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात २० विद्यार्थी सहभागी झाले होते.

टाईम्स स्पेशल

पहिल्या गटाचे परीक्षण ललिता केतकर, वृषाली यादव तर दुसऱ्या गटाचे मेधा फणसे, ऐश्वर्या चितळे आणि तिसऱ्या गटाचे गौरी गोखले व अपूर्वा फणसे यांनी केले. या स्पर्धेत परिसरातील प्रेमाजिभाई आसर प्राथमिक विद्यालय, आर.सी.काळे विद्यालय पेढे परशुराम, गद्रे इंग्लिश मिडीयम, एस.पी.एम परशुराम, मेरीमाता, सह्याद्री शिक्षण संस्था आदी अनेक शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी सूत्रसंचालन दुहिता जोशी यांनी केले. यावेळी किशोर फडके, विजय भिडे, वैभव नाखरे, सचिन चितळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg